विधान परिषदेसाठी निवडलेले गेलेले सात आमदार कोण?
हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)
मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे)
पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा)
विक्रांत पाटील (भाजपा)
चित्रा वाघ (भाजपा)
उच्च न्यायालयात पार पडली तातडीची सुनावणी
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांकडून याचिका कोर्टात सादर करण्यात आली. निकाल राखून ठेवताना कोणतेही निर्देश नव्हते असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. त्यानंतर आम्ही कोणतंही आश्वासन कोर्टाला किंवा याचिकाकर्त्यांना देण्यात आलेलं नाही.
महंत बाबूसिंग महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी पोहरादेवीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना सगळी माहिती देण्याचं काम बाबूसिंग महाराज यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे विक्रांत पाटील आणि चित्रा वाघ यांनाही भाजपाने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते हेमंत पाटील हे तिकीट कापल्याने नाराज झाले होते त्यांना आता विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. तर मनिषा कायंदे या सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या आमदार झाल्या आहेत.






















Join Our Whatsapp Group