भोसरी (Pclive7.com):- “जन्मदात्या आईनंतर जास्त प्रेम देते, आपुलकीने जपते, जगायला शिकवते ती मावशी..” म्हणूनच भोसरी माझी आई, तर चऱ्होली माझी मावशी आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये चऱ्होलीकरांनी कायम साथ दिली आहे आणि यापुढेही साथ देत राहणार असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी आज (दि.२०) व्यक्त केला.

भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी आज रविवारी (दि.२०) चऱ्होलीतील ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज यांचा आशिर्वाद घेतला आणि निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव तसेच अनेक माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह चऱ्होली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्रिक करण्यासाठी आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी दंड थोपटले आहेत. गेल्या दोन टर्म प्रमाणे याही निवडणुकीत चऱ्होली ग्रामस्थ महेश लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. माजी महापौर नितीन काळजे यांनी महेश लांडगे यांना या निवडणुकीत चऱ्होली परिसरातून पुन्हा एकदा मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.





















Join Our Whatsapp Group