पुणे (Pclive7.com):- पुण्यातील महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेत मेट्रो स्थानकाचं मोठं नुकसान झालेलं असलं तरी कोणाही व्यक्तीला इजा झालेली नाही.
मेट्रो स्टेशनमधील तळघरात वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्यामुळं फोम साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला. अग्निशामक दलाकडून तातडीनं पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन पाच ते दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी नसून, आग वेल्डिंगचं काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group