भोसरी (Pclive7.com):- दिपावलीचा पहिला सण वसुबारस निमित्त गोमाता पूजन कुदळवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रभागामधील अनेक महिलांनी गोमातेचे पूजन केले. कुदळवाडी परिसरातील महिलांना गोमातेची पुजा करता यावी यासाठी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी गोमाता पूजनाची कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिर चौकात खास व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी परिसरातील अनेक महिलांनी गोमातेची पुजा करून नैवेद्य दाखवून दर्शन घेतले. याप्रसंगी अनेक नागरिक उपस्थित होते. गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. यासाठी केली जाते गाय-वासराची पुजा!
गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.