महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या महाविजयासाठी आमदार अश्विनी जगताप यांचे चिंचवडगाव वासियांना साकडे
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेच्या विकासाची धुरा सक्षम नेतृत्वाच्या हातात द्या, विकासाची ही गंगा अखंडपणे वाहती ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना मतदारांनी भरघोस मतांनी विजयी करा असे साकडे आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवडगाव वासियांना घातले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवडगाव येथील ग्रामस्थ तसेच मतदारांची भेट घेत संवाद साधला.

यावेळी माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, आवेश चिंचवडे, गणेश मिरजकर, योगेश चिंचवडे, अजित कुलथे, रवि देशपांडे, मधुकर बच्चे, विनोद मालू, शुभम डांगे, प्रदिप सायकर, प्रशांत आगज्ञान, गणेश गावडे, सुजित गावडे यांच्यासह महायुतीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी, यासह चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यात आमदार अश्विनी जगताप यांनी सर्वपक्षीय माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते तसेच महिला मंडळांच्या सदस्यांसोबत संवाद साधला आणि विविध गाठीभेटी घेतल्या. यावेळी आमदार जगताप म्हणाल्या की, सर्व समावेशक घटकांचा आणि आपल्या चिंचवड विधानसभेचा सर्वांगीण विकास समावेश हेच आमचे उद्दिष्ट आहे. शंकर जगताप यांच्या विजयाने हा विकासाचा प्रवास आणखी बळकट होणार आहे, असा विश्वास अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा वारसा जपण्याचे उद्दिष्ट आणि यापुढील काळात त्याला अधिक प्रगतीची दिशा देण्याचा संकल्प अश्विनी जगताप यांनी सर्वांसमोर मांडला. गेल्या काही वर्षांत मतदारसंघातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्यसेवा, शैक्षणिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती या सर्व मुद्द्यांवर आम्ही सातत्याने काम केले आहे. तसेच यापुढेही चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकास करण्याकरिता महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले आहे.

























Join Our Whatsapp Group