पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात कोअर समितीचे सर्व सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारी अध्यक्ष या शहराच्या राजकीय दृष्टीने महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पदावर निवड झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे हे प्रथमच भाजपा शहर कार्यालयात आले होते. यावेळी शत्रुघ्न काटे यांचे शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कोअर समितीच्या सर्व सदस्यांनी हार व पुस्तक देऊन शत्रुघ्न (बापू) काटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेशजी पिल्ले, प्रदेश सदस्य ॲड.मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, महेश कुलकर्णी, माजी महापौर आर.एस. कुमार, स्थायी समतीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, सरचिटणीस संजयजी मंगोडेकर, भोसरी विधानसभा प्रभारी विजय फुगे, वरीष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, रावेत-काळेवाडी मंडलाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, वाकड-थेरगांव मंडलाध्यक्ष प्रसाद कस्पटे, रहाटणी- सांगवी मंडलाध्यक्ष संदिप नखाते, माजी नगरसेवक संदिप वाघेरे, संदिप कस्पटे, बाळासाहेब भुंबे, प्रमोद ताम्हणकर, राम वाकडकर यांसह विविध आघाड्यांचे प्रदेश पदाधिकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.