चिंचवड (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन आणि चिंचवड वाहतूक विभाग या ठिकाणी दिवाळी निमित्त पोलीस बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक (गुन्हे) दिपक गोसावी, चिंचवड वाहतूक विभागाचे डामसे, पोलीस अधिकारी सागर आढारी ,पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्वरूपा खापेकर, मावळ लोकसभा युवती संपर्क प्रमुख सायली साळवी, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा रेश्मा शिंदे, पुणे जिल्हा सचिव रामचंद्र बांगर, चिंचवड विधानसभा सचिव राकेश सायकर, उद्योजक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत खुळगे, उद्योजक आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान शिंदे, जयेश महाजन, सुभाष खुर्चे, किर्तेश चौधरी, मानस भिरूड आदि उपस्थित होते.
गजाननभाऊ चिंचवडे म्हणाले की, ऊन, वारा, पाऊस सोसत शहरातील रहदारी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखणार्या पोलीस बांधवांप्रती आपला स्नेह कायम राखून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. याच हेतूने पोलीस बांधवांना मिठाई वाटप करत त्यांच्यासोबत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.