पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि ३ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
काय आहे अजित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट –
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष) यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत मी त्यांना लवकर बरे व्हावे आणि लवकरच लोकसेवेत रुजू व्हावे, अशी प्रार्थना केली.