पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उद्या (दि.७) रोजी सांगवी परिसरात बैलगाडीतून ‘अच्छे दिनची गाजर यात्रा’ काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली.
या यात्रेत वाढलेली महागाई व इतर समस्यांबाबत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार आहेत. ही यात्रा उद्या शनिवारी (दि.७) सकाळी साडेदहा वाजता नवी सांगवी येथील साई चौक येथून निघणार असून या यात्रेचा समारोप पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्क येथे होणार आहे.





















Join Our Whatsapp Group