आळंदी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या गुंडास पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. ८) रात्री पावणे एक वाजताच्या सुमारास चाकण येथील आळंदी फाटा येथे करण्यात आली. हरिओम गणेश पांचाळ (२४, रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलिस अंमलदार सागर बाळासाहेब जैनक (३२) यांनी शुक्रवारी (दि. ८) याबाबत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम पांचाळ याला पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी दोन वर्षांकरिता संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र, तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group