पिंपरी (Pclive7.com):- वाढते नागरीकरण आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी चिंचवडच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला राज्याच्या मंत्रिमंडळाने आज (मंगळवारी) मंजुरी दिली आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला आयुक्तालयाचा विषय मार्गी लागला असून लवकरच पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्तालय कार्यान्वित होणार आहे. शहरी व ग्रामीण अशा एकूण १५ पोलीस ठाण्यांचे मिळून हे आयुक्तालय होणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, गुन्हेगारीकरण यामुळे आघाडी सरकारपासून पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करावे, ही मागणी सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी तशी घोषणाही केली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्ताला मंजुरी मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडसाठी नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली. नवीन आयुक्तालयात पुणे ग्रामीण मधील ५ तर पुणे शहर मधील ९ पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे. पोलीस आयुक्तालयाची लागणारी जागा तात्पुरती भाड्याने घेण्यात येणार आहे, असे बापट यांनी म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group