पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पिंपरी चिंचवड मधल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे पलटवार केला आहे… कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेची निविदा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यात भ्रष्टाचार सिद्ध झाल्याची टीका केली होती. दादा-भाऊ मिळून खाऊ अशा शब्दात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यावर टीका केली होती…! त्याला प्रत्योत्तर देताना मी जर कचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेल अशा शब्दात लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले… राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे मनोरंजनाचा आर्केस्ट्रा असल्याची टीका त्यांनी केलीय…!
कचरा निविदा प्रक्रियेत एक रुपयांचा मिंदा असेल तर राजकारण सोडेन – आमदार लक्ष्मण जगताप























Join Our Whatsapp Group