भोसरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीच्या विजयाचा जल्लोष मध्यप्रदेश महेश्वर याठिकाणी साजरा केला.

भोसरी विधानसभेत तिसऱ्यांदा सर्वधिक मताधिक्याने निवडून आले. दरम्यान सर्व कार्यकर्ते चिखली गावातील 750 यात्रेकरूंना घेऊन उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर येथे धार्मिक यात्रेला गेले होते. 20 नोव्हेंबला मतदान करून यात्रेस निघाले होते. 23 नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत महेश्वर याठिकाणी होते.
युवा नेते जितूभाऊ यादव यांनी अभिनंदनचे फ्लेक्स आणले होते. आमदार महेश लांडगे यांची हॅट्रिक होताच सर्व यात्रेकरुंनी तसेच जितूभाऊ यादव मित्र परिवाराच्या वतीने महेश्वर येथे जल्लोष करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group