भोसरी (Pclive7.com):- विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासाठी डाव मांडले जात आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मांढरदेवीच्या काळुबाई चरणी अभिषेक करून साकडे घालण्यात आले आहे.
भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ११ मधील सामाजिक कार्यकर्त्या किर्ती मारुती जाधव यांच्यावतीने आज मांढरदेवी काळुबाई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मांढरदेवीला जाऊन देवीला रूद्राभिषेक व साकडे घालण्यात आलं.






















Join Our Whatsapp Group