पिंपरी (Pclive7.com):- गुलेन बॅरि सिंड्रोम हा नवा आजार नाही, कारण पिंपरी चिंचवड शहरात नोव्हेंबर महिन्यापासून बारा रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सहा महिला, चार पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पैकी सहा रुग्णांनी यावर मात केली असून सहा रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
पुण्यात एकाच भागात गुलेन बॅरि सिंड्रोमचे अनेक रुग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील विविध भागात या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध रुग्णालयात सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून घाबरण्याचे कोणते कारण नसल्याचे डॉ. गोफणे यांनी म्हटले होते.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, सदर आजार हा नवीन नसुन यापूर्वीही या आजाराचे रुग्ण काही प्रमाणात आढळून आलेले आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नये. परंतु लक्षणे आढळून आल्यास त्वरित मनपाच्या नजीकच्या रुग्णालयात तज्ञांचा सल्ला घ्यावा. सदर आजारावर आवश्यक असणारे औषधोपचार मनपाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच सर्व खाजगी रुग्णालयांना आवाहन करण्यात येते कि, सदर आजाराचे रुग्ण आढळल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागास त्वरित कळविण्यात यावे जेणेकरून रुग्णांचे एकाच भागामधील Cluster आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोयीस्कर होईल.
Guillain – Barre Syndrome आजाराचे सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे: –
-
हातापायातील ताकद कमी होणे.
-
हातापायाला मुंग्या (tingling sensations) येणे.
-
गिळण्यास व बोलणेस त्रास होणे.
-
धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे.






















Join Our Whatsapp Group