पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असून त्या ठिकाणी खाजगी सुरक्षारक्षक कंपनी अनंत स्काय इन्फाटेक एजंसी ह्याचा सुरक्षा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
पुणे मेट्रोचे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर यांना या संदर्भात सचिन काळभोर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीचे कामगार गुंड प्रवृत्तीचे असून त्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी निगडी येथील भक्ती शक्ती ह्या ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी मेट्रो प्रकल्प काम करणारे अधिकारी व कर्मचारी ह्यांना मारहाण केली होती. त्या संदर्भात निगडी पोलिस स्टेशन ह्या ठिकाणी फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी मेट्रो रेल्वे ह्यांनी खाजगी बाउन्सर नियुक्ती केली असून सदर बाउन्सर हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून त्याचे चरीत्र पडताळणी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल दाखला पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर ह्यांच्या मार्फत घेण्यात यावा. मेट्रोच्या सुपरवायझरने एका ट्रक चालकासोबत मिळून मेट्रो साईटवरून २० लाखांचे लोखंड चोरी केले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. ही घटना १० सप्टेंबर २०२४ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत भक्ती-शक्ती ते खंडोबा माळ चौक यादरम्यानच्या मेट्रो मार्गावर घडली आहे. सुपरवायजर हरिश्चंद्र सुनील कुमार (रा. निगडी), ट्रकचालक महंमद अनिल पटेल (रा. मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रवी रेडियार यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते निगडी या दरम्यान मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. या कामावरील साहित्यावर लक्ष ठेवण्यासाठी मेट्रोने फिर्यादी यांची अनंत स्कायइन्फ्राटेक एजन्सी नेमली आहे. या एजन्सी करून आरोपी हरिश्चंद्र याला सुपरवायजर म्हणून नेमण्यात आले होते. हरिश्चंद्र याने ट्रक चालक महंमद याच्यासोबत मिळून भक्ती-शक्ती चौक ते खंडोबा माळ चौक या दरम्यानच्या मेट्रो साईटवरून तब्बल २० लाख रुपये किमतीचे ४० टन लोखंड चोरी केले. मेट्रोच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळ ठेकेदार ह्याचे सुरक्षा रक्षक तैनात नसून त्या ठिकाणी उपठेकेदार ह्यांनी बोगस खाजगी ठेकेदार मार्फत सुरक्षा रक्षक व बाउन्सर तैनात करण्यात आले असून ते गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती असून त्या संदर्भात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर तसेच इतर अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

























Join Our Whatsapp Group