पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील एम्पायर इस्टेटच्या उड्डाणपुलासाठी महापालिकेने संत मदर तेरेसा यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, उद्घाटनापूर्वी शहरातील मातंग समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि बारा बलुतेदार संघटनांच्या वतीने “क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे उड्डाणपूल” असे नामकरण करण्यात आले आहे.
एम्पायर एस्टेट येथे द्रुतगती उड्डाण पूल उभारण्यात आला असून लवकरच तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या एम्पायर इस्टेट पुलाला सेंट मदर तेरेसा यांचे नाव देण्याच्या निर्णय राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत सत्ताधारी भाजपने उड्डाण पुलाला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याचा ठराव केला होता. त्यावरून आरोप होऊ लागल्याने हा ठराव मागे घेत सेंट मदर तेरेसा यांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यानंतर आता उद्घाटनापूर्वीच शहरातील संघटनांनी ‘क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे उड्डाणपुल’ असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच, हे नाव कायमस्वरुपी करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे.
यावेळी मातंग समाजाचे नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, युवराज दाखले, धनंजय भिसे, बाळासाहेब खंदारे, गणेश क्षिरसागर, बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल साठे, अण्णा कसबे,संजय ससाने, राजु धुरंदरे, सतीष भवाळ, संदिप जाधव, राजु आवळे, गणेश आडागळे, आभिजीत शिंदे, कुणाल सातव, नितीन वाटकर, संजय शेळके, अविनाश कदम, मंगेश नढे, गणेश साठे, दिपक लोखंडे, मयुर लोंढे, सुनिल मस्के, आविनाश शिंदे, सोमनाथ वायंदडे, मयुर लोंढे, गणेश लोंढे, आमोल तेलंगे, बाळासाहेब बागुल, हनिफभाई पठाण, सचिन कांबळे, सोमनाथ साठे, आदी उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group