मोशी (Pclive7.com):- डॉक्टरांच्या अथक सेवेचा सन्मान… भेटवस्तू… केक कटींग… धन्वंतरी पूजन… वार्षिक सर्वसाधरण सभा… गणेशवंदना… स्नेहभोजन अशा विविध उपक्रमांनी मोशी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर्स-डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मोशीतील हॉटेल मोशी ग्रँन्ड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अमृत पेरणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाखेत काम करणारे असोसिएशनचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते. सचिव डॉ. पवन वैरागर यांनी मागील वर्षात केलेल्या उपक्रमांची व पुढील वर्षात नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.

असोसिएशनचे खजिनदार डॉ. विशाल कुरकुटे यांनी खर्चाचा तपशील सांगितला. तसेच संस्थापकीय सदस्य डॉ. कृष्णकांत मानकर, डॉ. राहूल साबळे, डॉ. सचिन बोराटे यांच्या हस्ते असोसिएशनच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) चे उद्घाटन करण्यात आले. सर्व सदस्यांना असोसिएशनचे आयकार्ड आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कमिटी सदस्य डॉ. शितल मानकर, डॉ. सुरेंद्र वारे, डॉ. भाग्यश्री लहाने-मुंडे, डॉ. शिवदास म्हावरकर, डॉ. मीनल डुंबरे, डॉ. सोनल काटे, डॉ. अभिजीत कुदळे यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल चौधरी यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने आणि कवितेने सर्वांची मने जिंकली.