पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पे ॲण्ड पार्क आणि व्हॉट्स ॲप पार्किंग सुविधेचे अनावरण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते मंगळवारी (दि.८) करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना आता अधिक सुलभ पद्धतीने पार्किंग बुक करता येणार आहे.

या सुविधेचा वापर करून वाहनचालक व्हॉट्स ॲपच्या ८६२४९२५९३४ या क्रमांकावरून वाहन पार्किंग बुक करू शकतात. हे बुकिंग वापरकर्त्यांच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवले जाते. वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तात्काळ सूचना पाठवली जाते. ती जागा पुढील वाहनचालकांसाठी खुली केली जाते. शहरातील पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, एम्पायर इस्टेट, निगडी, भक्ती शक्ती येथील दहा ठिकाणी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना पार्किंग शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

या सेवेमुळे वाहन चालकांना पार्किंगविषयीची माहिती तात्काळ व्हॉट्स ॲपवर मिळणार आहे. स्मार्ट अलर्ट्सद्वारे वेळेचे व्यवस्थापन होणार आहे. पार्किंग प्रक्रियेत सुसूत्रता आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे, असा दावा महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी दिली. दरम्यान, वाहन पार्किंगची ही सुविधा यापूर्वीच ॲप आणि क्यूआर कोडवर उपलब्ध आहे.






















Join Our Whatsapp Group