
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील बीआरटी लेनमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वाराचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात त्याचे डोके बीआरडी बस स्टॅन्डच्या लोखंडी ग्रील मध्ये अडकले होते.

बीआरटी लेनमधून भरधाव वेगाने प्रवास करणाऱ्या बाईकस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बाईकस्वाराचे डोके चक्क बीआरटी बस स्टॅन्डला असलेल्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले होते.

या अपघातात बाईक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बीआरटी लेनच्या नियमांचे उल्लंघन आणि अतिवेग यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.






















Join Our Whatsapp Group