महिलांकडून पारंपरिक पद्धतीने औक्षण करत उत्स्फूर्त प्रतिसाद
भोसरी (Pclive7.com):- पूर्णानगर परिसरात प्रभाग क्रमांक ११ मधील इंद्रायणी महिला प्रतिष्ठान अध्यक्षा निशा दिनेश यादव यांनी नागरिकांच्या सदिच्छा भेटी घेत परिचय पत्राचे वितरण केले. घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवादातून परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि विविध प्रश्नांची माहिती त्यांना जवळून समजून घेता आली.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे. या विकासाच्या कार्यात आपणही सहभागी होऊन आमदारांचे हात बळकट करायचे आहेत. असे मनोगत निशा यादव यांनी व्यक्त केले.

या भेटीदरम्यान परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा विश्वास पाहून निशा यादव यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांचा हा स्नेह आणि पाठिंबा आपल्यासाठी प्रेरणादायी असून या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पूर्णानगर परिसरातील नागरिकांमध्ये या भेटीमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनतेशी थेट संपर्क साधण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांचा विश्वास आणि स्नेह हीच माझ्या कामाची खरी ताकद आहे. त्यांच्या अपेक्षा आणि समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.– निशा दिनेश यादवअध्यक्षा, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान





















Join Our Whatsapp Group