पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.१२ तळवडे – रुपीनगर त्रिवेणी नगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून ‘होम टू होम’ या संकल्पनेतून थेट नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला जात आहे. येथील उमेदवार पंकज भालेकर, शरद भालेकर, सौ. सीमा भालेकर व सौ. चारुलता सोनवणे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रेडझोन हद्दीत येणाऱ्या आणि रेडझोन बाधित मिळकतधारकांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे. यामुळे या भागातील करमालकांवरील आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यापूर्वी ज्या मिळकतींवर १४,१४२ रुपये इतका सामान्य कर आकारला जात होता, त्यामध्ये ५० टक्के सवलत मिळाल्याने आता केवळ ७,०७१ रुपये इतकाच कर भरावा लागणार आहे.

मालमत्ता कराच्या सामान्य घरांवर ५० टक्के सवलत मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सवलतीमुळे मध्यमवर्गीय आणि रेडझोनमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर “दिलासा देणाऱ्या नेतृत्वाला आशीर्वाद द्या” असा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून नागरिकांच्या घरोघरी गाठीभेटी घेत प्रचार करत आहेत. विकासकामे, करसवलत आणि थेट संवाद याच्या जोरावर प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.






















Join Our Whatsapp Group