पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार थेट आझम पानसरेंच्या भेटीला आले आहेत. पानसरे हे पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं या भेटीमागे नेमकं काय कारण असेल? याबाबत चर्चा रंगलेल्या आहेत.

काल आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दुसरीकडे काल आझम पानसरेंच्या घरात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी बैठक घेतली होती.तर भाचा झिशानच्या कार्यालयात दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली होती.

त्यामुळं आज अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र आणण्याच्या अनुषंगाने चर्चा करायला आलेत की मुलगा निहाल नंतर आझम पानसरेंना ही स्वतःच्या पक्षात येण्याचं आमंत्रण द्यायला आलेत. याबाबतचा खुलासा स्वतः अजित पवार करतील.






















Join Our Whatsapp Group