पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर येथे अनिता संदीप काटे यांनी गाठीभेटी दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात परिसरातील विविध सोसायट्या व वस्ती भागांना भेट देत त्यांनी नागरिकांच्या दैनंदिन समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या.

नागरिकांनी मांडलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक व नागरी सुविधांबाबतच्या प्रश्नांचा सखोल आढावा घेत, त्या सोडवण्यासाठी ठोस आणि वेळबद्ध प्रयत्न करण्याचे आश्वासन अनिता काटे यांनी दिले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध कामकाज, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागावर भर देत त्यांनी आपले स्पष्ट व्हिजन मांडले.

या गाठीभेटींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्या विश्वासपूर्ण पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे अनिता संदीप काटे यांनी यावेळी सांगितले.























Join Our Whatsapp Group