पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या अधिकृत १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या यादीत विविध प्रभागांतील सर्वसाधारण, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. मनसेने शहरातील विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देत निवडणूक रिंगणात उतरवलेले उमेदवार हे स्थानिक प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मनसेचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक 2 –
• श्री. जयसिंग भाट (ड) – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 6 –
• श्री. निलेश सूर्यवंशी (ब) – ओबीसी
प्रभाग क्रमांक 8 –
• श्री. प्रतिक बबन जिते (ड) – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 10 –
• सौ. गीता नितीन चव्हाण (ब) – महिला ओबीसी
• श्री. कैलास दुर्गे (क) – सर्वसाधारण
• श्री. हर्षकुमार महाडिक (ड) – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 13 –
• श्री. सचिन तुकाराम चिखले (ड) – सर्वसाधारण
• सौ. अश्विनी सचिन चिखले (क) – महिला सर्वसाधारण
• श्री. शशिकिरण गवळी (अ) – अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 14 –
• सौ. आदिती चावरिया (ब) – महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15 –
• सौ. स्वाती चंद्रकांत दानवले (क) – महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 16 –
• सौ. अस्मिता प्रदीप माळी (ब) – महिला ओबीसी
प्रभाग क्रमांक 19 –
• सौ. लता खंडू शिंदे (अ) – अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 21 –
• श्री. राजू सुदाम भालेराव (ड) – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 27 –
• श्री. तुकाराम सदाशिव शिंदे (अ) – अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक 30 –
• सौ. रेखा सुधीर जम (क) – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 32 –
• श्री. राजू सावळे (ड) – सर्वसाधारण

ही यादी मनसेचे पिंपरी–चिंचवड शहर सचिव रुपेश बाजीराव पटेकर व शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जाहीर केली. मनसेचे उमेदवार शहरातील नागरी प्रश्न, मराठी माणसाचा हक्क आणि स्वाभिमानासाठी निवडणुकीत ठोस भूमिका मांडणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group