पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजपाने दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता पिंपरी चिंचवड भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि. ३ जानेवारी) सकाळी ११ वाजता भक्ती शक्ती उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती शक्ती समूह शिल्प येथून प्रचारास शुभारंभ होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे तसेच भाजपाचे सर्व प्रभागातील उमेदवार, भाजपा प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष निमंत्रक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

























Join Our Whatsapp Group