नवी सांगवी (Pclive7.com):- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याचे शिल्पकार व आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पुणे–पिंपरी चिंचवड दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नवी सांगवी येथील अपक्ष उमेदवार पायल अमित पसरणीकर यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

या भेटीवेळी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनातील ‘चलो मुंबई’ या ऐतिहासिक आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईत निघालेल्या भव्य मराठा मोर्चाच्या वेळी सांगवी फाटा येथे मोर्चा थांबविण्यात आला होता. त्या प्रसंगाच्या आठवणी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी भावनिक शब्दांत शेअर केल्या.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांनी पायल अमित पसरणीकर यांना “विजयी भव” असा आशीर्वाद दिला. अपक्ष उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मिळालेला हा आशीर्वाद अत्यंत मोलाचा असल्याची भावना पसरणीकर यांनी व्यक्त केली.

जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर परिसरातील कार्यकर्ते व समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे पायल अमित पसरणीकर यांनी सांगितले. प्रभागातील सर्व स्तरांतील नागरिकांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असून, गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याची हीच पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.






















Join Our Whatsapp Group