पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. आकुर्डीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आकुर्डीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल मजबूत असून एकजुटीने प्रचार सुरु आहे. संपूर्ण प्रभाग दोनवेळा पिंजून काढला आहे. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चारही उमेदवारांना आशिर्वाद देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आकुर्डीत येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता अजितदादांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी चारही उमेदवारांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. दोनवेळा प्रभागातील प्रचार फेऱ्या, पदयात्रा, रॅली पूर्ण झाली आहे. या रॅलीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच अजित पवार यांची सभा होणार असल्याने आकुर्डीतील वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमय होणार आहे.






















Join Our Whatsapp Group