रहाटणी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते शरद नखाते व राकेश नखाते यांनी आपल्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत, भर सभेत पार पडला.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. पंकजाताई मुंडे या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रहाटणीत आयोजित सभेत आल्या होत्या यावेळी हा प्रवेश करण्यात आला. नखाते बंधूंनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे.

हरिभाऊ नखाते यांचे सुपुत्र असलेल्या शरद व राकेश नखाते यांनी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नखाते बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत आगामी काळात संघटनात्मक कामासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून भाजपच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचे मानले जात आहे.






















Join Our Whatsapp Group