पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळेगुरव, प्रभाग क्रमांक ३१ मधून नवनिर्वाचित नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांनी निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात करून नागरिकांच्या अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी थेट प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. याबरोबरच प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांनी आपल्या कामाची सुरुवात विनायकनगर परिसरातील प्रलंबित ड्रेनेजच्या कामापासून केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम मार्गी लावण्यावर भर दिला. निवडणूक जिंकून लगेचच प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निवडणुकीनंतर लगेचच ‘ऑन फिल्ड’ उतरणाऱ्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“आम्ही निवडून दिलेला उमेदवार निवडून आल्यानंतर लगेचच प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेने ‘ऑन फिल्ड’ उतरले आहे, याचा आम्हाला आनंद आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
कामात सातत्य, पारदर्शकता आणि नागरिकांशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर प्रभागाचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. भाजपा विकासात्मक भूमिका ठेवून काम करणारा पक्ष आहे. आगामी काळात प्रशासन आणि नागरिकांचा दुवा म्हणून काम करणार आहे.– ज्ञानेश्वर जगतापनगरसेवक, पिंपळे गुरव (प्रभाग ३१)






















Join Our Whatsapp Group