पुनावळे (Pclive7.com):- “एक रक्तदाता तीन जणांचे प्राण वाचवतो” या उदात्त संदेशासह Maddy’s Mission सन्मित्र क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत सन्मित्र क्रिकेट क्लब, पुनावळे गावठाण येथे संपन्न होणार आहे.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेता “संकल्प नवा, ध्यास नवा – प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा” या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे दान नसून समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे, या विचाराने प्रेरित होऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना तसेच त्यांच्या गरजू नातेवाईकांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व समाजघटकांना या उपक्रमाचा थेट लाभ होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन सर्व रक्तदाते व समस्त पुनावळे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
सुमित टकले – 8975229979
दीपक टकले – 9146775179
संकेत टकले – 7774915343
सर्व नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group