पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महापालिका मुख्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने शोकभावना व्यक्त करण्यात आली.

आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण करण्यात आणि शहराचा सर्वांगीण कायापालट करण्यात अजितदादा पवार यांचा मोलाचा वाटा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनावर कडक शिस्त ठेवतानाच अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायी राहिली असल्याचे मत अनेक कर्मचाऱ्यांनी मांडले.

अजितदादा पवार यांच्याबाबत व्यक्त झालेल्या शोकभावनांमधून महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भावनिक सूर स्पष्टपणे दिसून आला.






















Join Our Whatsapp Group