पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. ना. श्री. अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उद्या शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोकसभा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे (दि.३०) सायंकाळी ठीक ४.०० वाजता आयोजित करण्यात आली असून, या सभेस शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आजी-माजी आमदार व खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, सामाजिक संस्था (एन.जी.ओ.), सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

या शोकसभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group