पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाकरिता भाजपकडून रवी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आमदार महेश लांडगे आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीत भाजपाने 128 पैकी 84 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले आहे. त्यानंतर महापौर पद हे सर्वसाधारण खुला गटाकरिता आरक्षित करण्यात आलं. त्यामुळे महापौर पदासाठी अनेक जण तीव्र इच्छुक झाले होते. मात्र दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे यांना पक्षाने महापौर पदाची संधी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group