पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २७ व्या महापौरपदाची निवड आज शुक्रवारी (दि.६) सकाळी अकराला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड होईल. ते २७ वे उपमहापौर असणार आहेत. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानंतर महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू होणार आहे.

महापौर पदासाठी भाजपाकडून नगरसेवक रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आला आहे तर, उपमहापौर पदासाठी भाजपाच्या नगरसेविका शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेविका वैशाली काळभोर यांचा अर्ज आहे. पुण्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनातील तळमजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकराला ती विशेष सभा होणार आहे. प्रथम महापौर पदाची निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उपमहापौर पदाची निवडप्रक्रिया होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागे घेतल्यास उपमहापौर पदाची निवडीही बिनबिरोध होईल. अन्यथा मतदानप्रकिया पार पडेल, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

महापालिकेच्या या पहिल्या सभेसाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह स्वच्छ करून नीटनेटके करण्यात आले आहे. तसेच, तिसऱ्या मजल्यावरील महापौर व उपमहापौराचे दालनही नीटनेटके करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group