पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील संत तुकारामनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका मनीषा शाम लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या विद्यालयात सध्या मराठी माध्यमाची शाळा सुरु आहे. प्रभाग क्रमांक २० मध्येच कासारवाडी येथे आकांक्षा फाउंडेशनच्या वतीने छत्रपती श्री शाहू महाराज इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. याच धर्तीवर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात यावी. आकांक्षा फाउंडेशन व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या मध्ये पूर्वीच करार झाला आहे.

संत तुकारामनगर मध्ये डॉ. डी. वाय. पाटील इंग्रजी माध्यमाची शाळा व जी. जी. इंटरनॅशनल या शाळा असून या शाळांमध्ये जास्त शालेय शुल्क आकारले जाते. पंडित उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झाल्यानंतर प्रभागातील व आजूबाजूच्या परिसरातील सामान्य कुटुंबांतील व गोरगरीब मुलांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण उपलब्ध होईल. त्यामुळे या शाळेच्या प्रस्तावासाठी आकांक्षा फाउंडेशन, महापालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नगरसेवकांची बैठक आयोजित करावी व पंडित उपाध्याय विद्यालयात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी अंमलबजावणी करावी, असे मनीषा लांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आयुक्तांना निवेदन देताना प्रभाग क्रमांक २० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शाम लांडे, नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group