पिंपरी (Pclive7.com):- आळंदी- चऱ्होली रोडवरील हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून १७ पीडित महिलांची सुटका केली आहे. सहा जणांना अटक करण्यात आली. मंगळवारी (दि.१०) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आळंदी- चऱ्होली रोडवरील साई पॅलेस हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.

कृष्णा सुरेश पाटील (वय ३५), राज मोहन शेट्टी (वय ५२), संजय अमीन बावरी (वय २५), साबीर अक्तर अली (वय ३१), भरत दत्तात्रय बिराजदार (वय २७) व विक्रम हिरा वढ (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर याच्यासह हॉटेलचालक पद्मलोचन दास ऊर्फ कालूशेठ, हॉटेलमालक अवधूत गाढवे यांचा शोध घेतला जात आहे.

या सर्वांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई महेश भारत लाडे (२८, रा. वडमुखवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. छाप्यात पोलिसांनी ५१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group