पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीतून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांच्या लोखंडी पार्ट्सची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.०९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायं. ७ वाजण्याच्या दरम्यान लॉंगवे ट्रान्सपोर्ट, बोऱ्हाडे वस्ती, मोशी येथून माल रवाना करण्यात आला होता. संबंधित चालकाकडे पिकअप गाडी (क्र. MH 14 JL 8348) सोपविण्यात आली होती. हा माल नऱ्हे येथील एका इंजिनिअरिंग कंपनीत पोहोचविणे अपेक्षित होते.

मात्र चालकाने विश्वासघात करून माल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता परस्पर विक्री करून गाडी नवी मुंबई विमानतळा जवळ सोडून तो फरार झाला असल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे. आरोपी इरफान असारी (वय २६, रा. नेतासुर हुराब्बा, महाराजगंज, उत्तर प्रदेश) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पानसरे करत आहेत.




















Join Our Whatsapp Group