पिंपरी (Pclive7.com):- महाशिवरात्रि निमित्त ब्रह्माकुमारी यांच्या वतीने सहस्र शिवलिंग दर्शन व अर्धनारीयश्वर जीवंत देखावा सादर करून महिला पुरुष समानतेचा संदेश देण्याचे कार्य केले आहे, असे मत तृप्ती देसाई (बिग बॉस मराठी फेम, अध्यक्षा- भू माता ब्रिगेड) यांनी आरोग्य शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
महाशिवरात्रि निमित्त ब्रह्माकुमारी यांच्या वतीने रायकर फार्म हाऊस बाणेर येथील ब्रह्माकुमारीज सेंटर मध्ये
सहस्र शिवलिंग दर्शन व अर्धनारीयश्वर जीवंत देखावा आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे शुभारंभ तृप्ती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक, डान्सर वैशाली जाधव, संजय कृष्णा रायकर, घन्यशाम रायकर, ब्रह्माकुमारी बाणेर शाखेच्या संचालिका डॉ. त्रिवेणी दिदी, सकाळनगरच्या संचालिका बी.के.गीता दिदी सहित ब्रह्माकुमारी मधील सदस्य, आरोग्य शिबीराचे डॉक्टर आदी उपस्थित होते.

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की. भू माता ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करित असतो. महिलांनी स्वबळावर आपले कतृत्व साकर करावे याची प्रचिती ब्रह्माकुमारी मध्ये दिसून आली. याठीकाणी अधिकतर महिलाच सक्षम दिसत आहेत, जे स्वत: सर्व कामे करित आहेत.
महाशिवरात्रिच्या दिवशी आरोग्य शिबीरा आणि चे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य शिबीराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. तसेच 48 नागरिकांनी रक्कतदान केले. सर्व रोगांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. तसेच डॉ. मंगेश (नाडी चिकित्सक) यांचे मार्गदर्शन सत्र संपन्न्न झाले.

आध्यात्मिक वातावरणात शिवभक्तांनी सहस्र शिवलिंगांचे आणि अर्धनारीयश्वर जीवंत देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. समाजहिताच्या उपक्रमांमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले






















Join Our Whatsapp Group