पिंपरी (Pclive7.com):- चाकण हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आहे. पोलीसांनी काल रात्री कारवाई सुरू केली असून, आत्ता पर्यंत एकूण २० जणांना अटक केली आहे. तर अन्य वीस जणांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटिल यांनी दिली आहे.
चाकण हिंसाचार प्रकरणी अटक केलेले कोण आहेत आणि त्यांची नावे काय आहेत याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली अाहे. त्यामुळे अटक केलेले आंदोलनातील कार्यकर्ते आहेत की, घुसखोर याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान काल अटक केलेल्यापैकी तीन आरोपी अल्पवयीन असुन त्यांनी पोलीसांना मारहाण केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजतीय. अटक केलेल्या सर्वांना आज दुपारी पुणे न्यायालया समोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांपैकी कोणा अटक केलेल्यांना सोडविण्याची मागणी करतोय का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.





















Join Our Whatsapp Group