पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड ६ फेब्रुवारीला झाली आहे. तर स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड आज (दि. २०) दुपारी २ वाजता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये होणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक ८४ व एक पुरस्कृत असे ८५ जागी यश मिळवले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ व शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानुसार, भाजपच्या रवी लांडगे यांची महापौर व शर्मिला बाबर यांची उपमहापौर पदावर बिनवविरोध निवड झाली आहे. महापालिका सभेत स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात येते. संख्याबळानुसार भाजप ११, राष्ट्रवादी ४ आणि शिवसेनेला १ याप्रमाणे स्थायीच्या सदस्यपदावर १६ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या सभेत गटनेते आपल्या सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात महापौरांकडे सादर करतात. महापौर त्या नावाचे वाचन करत सदस्यपदी सदस्यांची निवड करतात.

मागील सभेत महापौर व उपमहापौरांची निवड केल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली होती. ही तहकूब केलेली सभा आज होणार आहे. या सभेत स्थायी समितीच्या सदस्यांसह, महिला व बालकल्याण, शिक्षण, विधी, शहर सुधारणा, जैवविविधता, क्रीडा व सांस्कृतिक या विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.



















Join Our Whatsapp Group