पिंपरी (Pclive7.com):- दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल एआय समिटदरम्यान घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले.

दिल्लीमध्ये भारताच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित ग्लोबल एआय समिटचे आयोजन करण्यात आले असून, जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज नेते आणि इनोव्हेटर्स या परिषदेसाठी उपस्थित आहेत. देशासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी घुसखोरी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, हा प्रकार देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. भारत एआय आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत असताना अशा प्रकारच्या कृतींमुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि देशाची तांत्रिक प्रगती यावरही भाष्य करण्यात आले. राजकीय मतभेद लोकशाहीत मान्य असले तरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गोंधळ घालणे अयोग्य असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

या निषेध आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. देशाच्या प्रगतीला पाठिंबा देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय मंचांवर गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, भाजयुमो शहराध्यक्ष दिनेश यादव, शहर समन्वयक अजित कुलथे, शहर सरचिटणीस उदय गायकवाड, राहुल खाडे, प्रसाद कस्पटे, सुमित घाटे, दिनेश काटे, सम्यक साबळे, साची दोशी, उपाध्यक्ष देवयानी भिंगारकर, अतुल बोराटे, मयूर काळभोर, उमेश सांडभोर, सागर घोरपडे, आदम मुलानी, अभिजीत बागुल, मनोज घोडेकर, विशाल वाघेरे, राजेश चौधरी, रवी भिलारे, दीपक शिंदे, साईराज भालेकर, सुशांत पवार, अमीर शेख, गौरव शिरुडे, आशिष राऊत, निखिल शहाणे, जयदीप करपे, शैलेश स्वामी, विजय पवार, ओमकार पवार, प्रतीक भालेराव, अथर्व देवके, आकाश वाळके, रवी पारखे, अतुल काळोखे, अजय साने, ऋषिकेश भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group