पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचं अर्थसंकल्प पत्रकारांच्या अनुपस्थित सादर झालं. इतिहासात पहिल्यांदाचं असं घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नको त्या सुचनेमुळं पत्रकारांनी सभागृह सोडलं. तसेच प्रभारी आयुक्तांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याची ही भूमिका घेतली.

स्थायी समितीच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी, नेहमीप्रमाणे पत्रकार स्थानापन्न झाले. पण पत्रकारांनी मागे जावं आणि तिथं अधिकाऱ्यांनी बसावं, अशी नको ती सूचना दिली. खरं तर अर्थसंकल्पाच्या आधी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची निवड झाली, त्यावेळी याचं सभागृहात भाजपचे हौशे-नौशे कार्यकर्त्यांना विनापरवाना अतिक्रमण केलं. त्यावेळी आयुक्त हर्डीकरांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मागे व्हा, अशी सूचना देण्याचं धाडस झालं नाही. जे नियमांविरोधात घडत होतं, तिथं आयुक्तांनी मौन बाळगलं आणि आजवर पत्रकारांच्या उपस्थितीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावेळी आयुक्तांनी पहिल्यांदाच नको ती सूचना केली.
अर्थसंकल्प सादर झाल्यावर मी पत्रकारांशी बोलेन, असं म्हणत प्रभारी आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे पत्रकारांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. असं म्हणताचं पत्रकार आणि आयुक्तांमध्ये वाद झाले. एकतर भाजपच्या हौशे-नौशे कार्यकर्ते आत आले, त्यावेळी आपण चुप्पी साधली. मग आता नको ते नियम सांगून आपण काय साध्य करताय? असा प्रश्न विचारला असता आयुक्त अनुत्तरित झाले. आयुक्तांनी या नको त्या सूचना दिल्यानं पत्रकारांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर झाला.



















Join Our Whatsapp Group