पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील गंगानगर परिसरात एका मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याची घटना घडली. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास टॉवरमधून धूर आणि ज्वाळा निघत असल्याने परिसरात काही काळ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोबाईल टॉवरला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.



















Join Our Whatsapp Group