पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील बीआरटी रोडवर दुचाकीचा अपघात झाल्यानंतर झालेल्या वादातून एका तरुणाचा गळा दाबून आणि बेल्टने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारी (९ मार्च) रात्री ९ वाजेच्या सुमारास स्पॉट १८ मॉलसमोर घडली.

याप्रकरणी कुणाल विलास पालवे (२७, क्षितीज कॉलनी, जगताप डेअरी, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाबू पाटील (३०, काळेवाडी, पुणे), अभिषेक माडगुळे (२२, काळेवाडी, पुणे), विकी सुतार (३०, काळेवाडी, पुणे) आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांचा अपघात झाला. यावेळी तिथे कारमधून आलेल्या आरोपींनी “तुझीच चूक आहे” असे म्हणत वाद घातला. बाबू पाटील याने फिर्यादीचा गळा दाबला, तर त्याच्या साथीदाराने कमरेच्या बेल्टने फिर्यादीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर प्रहार केले. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. काळेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group