पिंपरी (Pclive7.com):- संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि इतर खासदारांनी संसदेच्या ‘मकर प्रवेशद्वारा’चा वापर ‘पिकनिक स्पॉट’प्रमाणे केल्याचा गंभीर आरोप करत आज पिंपरी- चिंचवड भाजपच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

नेमका वाद काय?
दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या मुख्य ‘मकर प्रवेशद्वारा’ जवळ एकत्र येऊन तिथे ‘पार्लमेंट पिकनिक स्पॉट’ तयार करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा अध्यक्षांच्या स्पष्ट निर्देशांनुसार,संसद परिसरातील कोणत्याही प्रवेशद्वाराजवळ धरणे-आंदोलन किंवा निदर्शने करण्यास मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करून काँग्रेसने संसदेच्या शिष्टाचाराची पायमल्ली केल्याचा दावा भाजपने केला आहे.
मोरवाडीत भाजपचे शक्तिप्रदर्शन
मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे म्हणाले की, “संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र, राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी या पवित्र जागेचा वापर वैयक्तिक प्रसिद्धी आणि पिकनिकसाठी करत आहेत. हा केवळ नियमभंग नसून देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा अवमान आहे.”
आंदोलनाची प्रमुख वैशिष्ट्ये:
प्रशासकीय शिस्त: लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा अवमान केल्याचा मुद्दा भाजपने प्रकर्षाने मांडला.
काँग्रेसवर टीकास्त्र: लोकशाहीच्या गप्पा मारणारी काँग्रेसच नियमांचे उल्लंघन केला आहे .
या आंदोलनात यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाड्ये, प्रदेश दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष राजेश पिल्ले, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, शितल शिंदे, मंदार देशपांडे, अमित गावडे, नगरसेविका आरती चोंधे, मनीषात पवार, स्नेहा कलाटे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, विशाल वाळुंजकर, देवदत्त लांडे, सचिन राऊत, विभीषण चौधरी, सतपाल गोयल, भूषण जोशी, धरम वाघमारे, संतोष तापकीर, नरेश खुळे, गोरख कुंभार, दिलीप गडदे, खंडू देव कठोरे, मनोज ब्राह्मणकर, दिनेश काटे पाटील आदी मान्यवर व भाजपचे आजी-माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख, मंडल प्रमुख आणि शहर कार्यकारणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group