पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीचे आयोजन विद्यमान नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्पर्धेत अनुपदादा मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन संचलित राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल येथील पैलवानांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्ण व चार रौप्य पदके पटकावली.

स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे –
३२ किलो गट : वेदास जाधव – रौप्यपदक
४५ किलो गट : अनिकेत गाडे – रौप्यपदक
५५ किलो गट : आयाज शेख – रौप्यपदक
७४ किलो गट : परशुराम कॅप – रौप्यपदक
६० किलो गट : तुषार पवार – सुवर्णपदक
६५ किलो गट : संकेत माने – सुवर्णपदक
९२ किलो गट : तेजस फेंगसे – सुवर्णपदक
सुवर्णपदक विजेते खेळाडू वाघोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही सर्व खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राजेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत असून त्यांच्या प्रशिक्षणामुळे खेळाडूंना हे यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या यशाबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






















Join Our Whatsapp Group