पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. केंद्रातून अाणि राज्यातून शहरासाठी निधी आणण्यापेक्षा एकमेकांसोबत भांडण करत बसण्याचा दोघांचाही उद्योग सुरू आहे. एवढीच आरोप-प्रत्यारोप करण्याची हौस असेल तर श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांनी खासदारकी अन् आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दत्ता साने म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे नाट्य सुरू आहे. या दोन्ही नेत्यांचा केंद्र आणि राज्यातील कामाकडे दुर्लक्ष होतयं. शहराचा विकास आणि निधी याच्याशी काहीही यांना देणंघेणं नाही. या दोघांचाही महापालिकेत इंट्रेस आहे. महापालिकेत काम करायला इथे १२८ नगरसेवक आहेत. मात्र खासदार आमदारांचा जीव महापालिकेच घुटमळला आहे. निवडणुका आल्या की, या दोघांचीही आरोप – प्रत्यारोपांची नौटंकी सुरू होते. आता या दोघांचीही आरोप करण्याची हौस फिटली असेल तर खासदार बारणे आणि आमदार जगतापांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी दत्ता साने यांनी केली.






















Join Our Whatsapp Group