पिंपरी (Pclive7.com):- दहीहंडीच्या उत्सवामध्ये भाजपा आमदार राम कदम यांनी महिला भगिनींच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा शिवसेना रहाटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
राम कदम यांचा निषेध करत शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी केली आहे. पळवा-पळवी नावाच महामंडळ निर्माण करून अध्यक्षपदी भाजपा आमदार राम कदमांची निवड करा अशी मागणी दाखले यांनी केली आहे. यापुढे कदम यांनी महिला भगिनींबद्दल अपशब्द किंवा अपमानास्पद वक्तव्य केल्यास शिवसेना स्टाईलने शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने बांगड्यांचा हार भेट दिला जाईल असेही युवराज दाखले यांनी म्हटलयं.






















Join Our Whatsapp Group