पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील मुळा नदीच्या पात्रात आज (दि.१७) दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या दरम्यान एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतदेह नदीपात्रात असल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जलपरी या विशेष बचाव वाहनाच्या मदतीने जवानांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला.
सदर महिलेने नदीत उडी कधी आणि कोणत्या कारणामुळे मारली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group